⁠ 
रविवार, मे 19, 2024

दुर्दवी : कारच्या धडकेत निलगायचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । जळगाव तालुक्यातील वावडदा गावात रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत निलगायीचा जागीच मृत्यू झाला कार रस्त्याच्या खाली येवून आदळल्याने चालकासह इतर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी ३ जुलै रोजी सकाळी शिरसोली ते वावडदा रस्त्यावर असलेल्या महामार्गावरून एरंडोलकडून जळगावकडे (एमएच १२ केटी १३३२) क्रमांकाची कार येत होती. त्यावेळी बाजूच्या जंगलातून निलगाय ही रोड क्रॉस करून जात होती. त्यावेळी भरधाव कारने निलगायीला जोरदार धडक दिली. या धडकेत निलगायीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रोडच्या खाली उरून आदळली गेली. या कारमधील चालकासह इतर काहीजण जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी रस्त्यावरील जाणाऱ्या वाहनधारकांनी मदतकार्य सुरू करून वाहतूक सुरळीत केली होती. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली आहे.