⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरात आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव रंगणार

जळगाव शहरात आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव रंगणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सव आज (दि. २७) ला शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान होईल. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व शहरातील मान्यवर उपस्थित राहतील.

क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येतील. यात दहिहंडी फोडण्याचा मान फक्त महिला गोविंदा पथकांना आहे. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होतील.

यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करतील. प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी करतील. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरणासह ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था असून जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे विराज कावडीया यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.