जळगाव शहर

श्री.संत ज्ञानेश्वर विद्यालयात दहीहंडीचा जल्लोष; पालकांची वेशभूषा स्पर्धा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे गोपाळकाला निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यांर्थ्यांनी राधा व कृष्ण यांची वेशभूषा साकार केली होती. प्रसंगी दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी उत्साहाचे वातावरण होते.

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे दरवर्षी गोपाळकाला निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधा यांची वेशभूषा करून दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी केले.

प्रसंगी श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा सजीव देखावा देखील यावेळी झाला. पाळणा हलवून “कृष्ण जन्मला ग, बाई जन्मला” या गीतावर भाविकांनी वातावरण भक्तिमय केले. वासुदेवाच्या भूमिकेत इयत्ता नववीचा भावेश पालवे तर देवकीच्या भूमिकेत इयत्ता नववीची रूतिका कासार होती. यावेळी जिवंत आरास करण्यात आली होती. पालकांसाठी देखील यावेळी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक योगिता बाविस्कर आणि द्वितीय क्रमांक रुपाली गाडे यांनी मिळविला.

भगवान श्रीकृष्णच्या भक्तिमय गीतांनी यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत नृत्य केले. प्रसंगी उपशिक्षिका उज्वला नन्नवरे,साधना शिरसाट , स्वाती नाईक,रूपाली आव्हाड, आम्रपाली शिरसाट,साक्षी जोगी,दिव्या पाटील, सोनाली जाधव, सोनाली चौधरी,पुनम निकम, कोमल पाटील, नयना अडकमोल, जयश्री खैरनार शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे दिनेश पाटील आदींनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button