Cyber Crime : दुसऱ्याचे नाव, पत्ता वापरत पाठवली महिलांची अंतर्वस्त्रे तेही ‘कॅश ऑन डिलेव्हरी’

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । बनावट इमेल आयडी, दुसऱ्याचे नाव, पत्ता वापरत महिलांची अंतर्वस्त्रे तेही ‘कॅश ऑन डिलेव्हरी’ ऑर्डर केल्याचे प्रकार घडला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

हितेश अनिल छायडे (वय ३५, रा. आचार्य श्री तुलसीनगर, पाचोरा रोड, ता. जामनेर ) यांच्या नामे अनोळखी भामट्याने इमेल आयडी, नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर महिलांची अंतर्वस्त्रे ऑर्डर करून सदर पत्तावर ‘कॅश ऑन डिलेव्हरी’ केली. या प्रकरणी हितेश अनिल छायडे यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोनी लीलाधर कानडे करीत आहे.