जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२१ । एरंडोल परिसरात सर्रास वृक्षतोड होत असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सद्य परिस्थितीत प्रत्येकाला वृक्षाचे महत्त्व कळत आहे. आपल्याला ऑक्सीजन किती महत्त्वाचे आहे ते कोरोना या आजाराने पटवुन दिले आहे. तसेच आता झाड किती महत्त्वाचे आहे हे नक्कीच सगळ्यांना कळले आहे परंतु एरंडोल तालुक्यात व परिसरात मात्र याउलट चित्र दिसत आहे.
परिसरात सर्रास वृक्षतोड होत आहे.विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी वृक्षतोड करुन लाकडाचे ढीग दिसुन येतात तसेच परिसरातील वीटभट्टी,कंपन्या याठिकाणी सर्रास पणे वृक्षतोड करुन लाकुड वापरली जात आहे. दि.४ फेब्रुवारी रोजी एरंडोल येथील महेंद्र श्रावण पाटील व नवल श्रावण पाटील यांनी एरंडोल शिवारातील स्वतःच्या मालकीच्या शेतातील पद्मालय रस्त्याकडील गट नं.३९९/१ शेतजमिनीच्या बांधावरील काट सांबराची झाडे तोडणाऱ्या वर व खरेदी करणाऱ्या वर कारवाई करण्यासाठी वन विभागाकडे तक्रार अर्ज केला होता.तसेच ज्यांनी झाडे तोडली त्यांची नावे देखील पाटील बंधूंनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केले होते. आज तब्बल तिन महिने उलटून देखील वन विभागाने कोणावरही कारवाई किंवा चौकशी केली नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.
या वरुन वन विभाग वृक्ष तोडीच्या बाबतीत किती उदासीन आहे.याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच याबाबत संबंधित अधिकारी यांना फोन केले असता फोन न उचलणे हे नित्याचे झाले आहे.याबाबत वन विभागाच्या या भूमिकेबद्दल शंका येत आहे. तरी परिसरात होणाऱ्या वृक्ष तोडीची लवकरात लवकर चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.