⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

डोंगरकठोरा शिवारात केळीचे घड कापले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । एकीकडे अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असताना यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील शेतात असलेल्या केळीच्या बागातील घड कापून नुकसान केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन भागवत भिरूड (वय ४४) यांनी पोलिसांत तक्रार दिली. भिरूड यांचे तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील शेत गट नंबर ४६८ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी केळीची लागवड केली आहे. १४ जुलै रोजी सकाळी नितीन भिरूड हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या केळीच्या बागातून घड कापून चोरून नेऊन नुकसान केल्याचे निदर्शनास आले. केळीच्या घडाचे नुकसान हे गावातील लताबाई जगन्नाथ उर्फ रविंद्र सोनवणे, प्रमिला रघुनाथ थाटे आणि रजनी छगन आढाळे यांनी चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.