जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२५ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते नागपूरदरम्यान दोन अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.या ट्रेनला भुसावळ आणि जळगाव स्थानकावर थांबा मिळाला असून त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

वेळापत्रक
०९१०९ क्रमांकाची विशेष गाडी २६ ऑगस्टला मध्यरात्री १२.३० वाजता सीएसएमटी मुंबई येथून सुटेल. त्याच दिवशी सकाळी ७.वाजून २३ मिनिटाने जळगावला तर ८ वाजेल भुसावळ स्थानकावर पोहोचेल. त्यांनतर दुपारी ३.४० वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०११०२ क्रमांकाची विशेष गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर येथून सुटेल. तर दुसऱ्या दिवशी भुसावळ रात्री १२. वाजून ३५ मिनिटाने, जळगाव स्थानकावर रात्री १ वाजेल पोहोचेल. त्यांनतर सकाळी ८.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचणार आहे.

कोणत्या थानकांवर असेल थांबा?
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे असतील. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह असतील. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.







