जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । प्रेयसीला भेटण्यासाठी अमळनेर येथे जाणार्या गुजरात राज्यातील सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कैलास आधार पाटील (रा. महादेव नगर, डिंडोली, सुरत) असं संशयिताचं नाव असून मंगरुळ-पारोळा रोडवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. कैलास हा गतवर्षीच्या डिंडोली पोलिस ठाण्यात संशयित होता. यासह त्याच्यावर एकुण १० गुन्हे दाखल आहेत.

काय आहे प्रकरण?
कैलास आधार पाटील दहा गंभीर गुन्ह्यात सहभागी असून सुरत पोलिसांचा ‘स्पेशल ऑपरेशन गृप’ त्याच्या मागावर होता. कैलास हा प्रेयसीला भेटण्यासाठी अमळनेर येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. तशी पोलिस आपल्या मागवर असल्याचेही कैलासला समजले होते. त्यासाठी सुरतचे पथक देखील जळगावात दाखल झाले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो प्रेयसीची भेट टाळून पारोळा तालुक्यातील जंगलात लपून बसला होता. त्यानुसार सुरत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बकाले, अशोक महाजन, संदीप पाटील यांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
अमळनेरकडे जाताना मुसक्या आवळल्या सोमवारी पहाटे तो जंगलातून बाहेर पडून अमळनेरकडे जात असताना पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. कैलास याच्या विरुद्ध खूनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. या शिवाय मुंबईच्या माहिम पाेलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. सुरतच्या लिंबायक पोलिस ठाण्यात खुन, गुजरात पोलिस कायदा कलम १३५, मारहाण, कोरोना निर्बंधाचे उल्लंघन, दंगल असे गंभीर नऊ गुन्हे दाखल आहेत. पुढील चौकशीसाठी त्याला डिंडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
- Jalgaon : दुकान फोडून तांब्याची चोरी, पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
- Jalgaon : अवघ्या सात दिवसांवर लग्न, त्यापूर्वीच तरुणाने उचललं धक्कादायक पाऊस
- Amalner : दूध विक्रीकरून वडिलांना हातभार लावणाऱ्या ‛भाग्यश्री’चा अज्ञात वाहनाने घेतला जीव
- Bhusawal : गावठी कट्ट्याने गोळी झाडून प्रौढाने संपविले जीवन
- विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना