जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । शहरातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरास सोशल मिडीयाच्या व्हाट्सॲपद्वारे एका व्यक्तीने अश्लील संदेश पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या व्हाट्सॲपवर अज्ञात व्यक्ती अश्लील संदेश पाठवीत व्हाईस कॉलिग करीत घाणेरड्या भाषेत बोलत होता. अनोळखी मोबाईल क्र.८७८८६५ ८२७६ या क्रमाकाहून महिला डॉक्टरास त्रास देण्याचा प्रकार गेल्या २७ ऑगस्ट पासून २०२२ सुरु आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.