गुन्हेजळगाव जिल्हाभुसावळ
सुसाईड नोटवरून सेल्समनच्या आत्महत्येप्रकरणी एकविरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । भुसावळ येथील रेशन दुकानावरील सेल्समनने सोमवारी सायंकाळी आमोदा शिवारात शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटवरून भुसावळ येथील पंचशील नगरातील रहिवासी मुन्ना साेनवणे याच्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा झाला आहे.
रेशनचे धान्य फुकटात दिले नाही म्हणून साेनवणेच्या धमकी व त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सागर भंगाळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मुन्ना साेनवणे याने भंगाळेंना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यास घाबरुन तसेच त्रासाला कंटाळून भंगाळे खचले होते. सतत अपमान होत असल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.