---Advertisement---
गुन्हे भुसावळ

भुसावळात नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । भुसावळातील घोडेपीर बाबा रस्त्यावरील फर्निचरच्या गोदामात सुरू असलेल्या गावठी दारू बनवण्याचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन दिवसांपूर्वीच उद्ध्वस्त केला होता. 

फर्निचर गोदामाची जागा भुसावळातील रवींद्र ढगे यांची असल्याने त्याचा संबंध थेट आमदारांचा कार्यकर्ता असा जोडून आमदार सावकारे यांची सोशल मिडीयावर (फेसबुकवर) बदनामी करण्यात आली होती. 

---Advertisement---

या प्रकरणी आमदारांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेता तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर, बबलू खान, राजकिरण प्रधान, किरण विसे, उमेश चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात भादंवि 500 व 501 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कंक करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---