जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । धनत्रयोदशी अर्थात दिवाळीला 24 आक्टोबर पासून सुरुवात होणार असून खिर्डी बाजारपेठेत गर्दी होत असतांना दिसत आहे ,जवळ येत असलेला दीपोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याचे दिसून येतआहे, दिवाळीची चाहुल सुरु झाली आहे असे पाहाव्यास मिळत आहे. खिर्डी बस स्टॅण्ड परिसरात आता पासूनच फटाक्याची दुकाने थाटलेली दिसून येत आहे.काही जन मोठ्या बजारपेठेकडे सुध्या खरेदि विक्री करण्यासाठी जात असल्याचे चित्र आहे.दीपावलीच्या पाश्वभुमिवर खिर्डी येथील बाजारपेठ हळूहळू सजत आहे.चार दिवसावर दीपावली सण उत्सव आहे.खिर्डी बस स्टॅण्ड परिसरात दुकानच दुकाने सजले आहे.
करोना नंतर यंदा प्रथमच धुम-धडाक्यात साजरी होणार आहे यात शंका नाही,खिर्डी हे 8 खेड्याचे बाजारपेठ आहे, फटाक्याच्या दुकानांचे अर्ज खिर्डी ग्रामपंचायतकडे सादर केले गेले असून सर्व दुकानदारांना दि.20 पासून परवानगी दिली जाणार होती.खिर्डी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायत ने 9 दुकानाला तात्पूर्ती एन ओसी दिली आहे.निंभोरा पोलीस स्टेशन मधून सुद्धा एनओसी घेतल्याचे समजते.
फटाक्याच्या दरात 40 ते 50 टक्यांनी वाढ
यंदा फटाक्यांना मागणी जास्त असल्याकारणाने व शिवकाशी येथे फटाक्याच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी 30 ते 35% टक्के फटाक्याचे दर वाढल्याचे दुकानदाराने सांगितले आहे.
दुकानात विविध प्रकारचे फटाके
भुईचक्कर,अणार,तडतडी फटाके, फुलझाडी,सुतली बाम्ब,रॅकेट सह प्रदूषणमुक्त फटाके विक्रीस आलेचे असल्याचे दुकानदार यांनी प्रतिनिधीस सांगितले.