⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | निवडणुकीच्या तोंडावर आ. किशोर पाटीलांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

निवडणुकीच्या तोंडावर आ. किशोर पाटीलांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून मतदानासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. मात्र अशातच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत. पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल होत असल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दि. २९ जुले २०२३ रोजी एक बालिका बेपत्ता झाली होती. त्यानंतर त्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना दि. ०१ ऑगस्ट २०२३ रोजी उघडकीस आली. गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल पाटील यास अटक करण्यात आली. सदर आरोपीस कडक शासन व्हावे यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व अँड. उज्वल निकम यांची सरकार पक्षातर्फे नियुक्ती होण्यासाठी दि.०४ ऑगस्ट रोजी सर्व पक्षीयांनी भडगाव तहसिल कार्यालयावरमुक मोर्चा काढला. नातेवाईकांच्या व मुक मोर्चाच्या मागणीबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने पत्रकार संदीप महाजन यांनी याबाबत बातमी प्रसारीत केली. बातमीच्या शिर्षकामध्ये मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी या शब्दाचा राग येवून आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना त्याच रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अश्लिल शिवीगाळ केली. त्यानतर दि. ०९ ऑगस्ट २०२३ रोजी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणही करण्यात आली होती.

याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता. त्यावर आमदार किशोर पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.