बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद न्यायालयाने दिले आहेत 

नेमकं प्रकरण काय? 
‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. 

यावरून  अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा गुन्हा रद्द करावा म्हणून इंदोरीकर महाराज यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.