धक्कादायक ! अमळनेरात एकाच दोराने गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपविले

डिसेंबर 2, 2025 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२५ । अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोराने गळफास घेऊन आत्म#@ ह त्या केल्याची घटना देवगाव देवळी येथे उघडकीस आली. दिनेश बद्री पावरा (वय २२) रा. हिंगोणे जळोद व एक १६ वर्षीय मुलगी असे आत्म#@ ह त्या करणाऱ्यांची नावे आहेत.

crime jpg webp

दिनेश हा जळोद येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर काम करत होता तर मुलगी ही मजुरी करत होती. देवळी येथील आयटीआय कॉलेजच्या मागे असलेल्या निंबाच्या झाडाला उंचावर एक युवक आणि युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले दिसले. देवळीच्या पोलिस पाटलांनी अमळनेर पोलिस स्टेशनला घटना कळवल्यावर डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेडकॉन्स्टेबल संतोष नागरे, उदय बोरसे यांनी भेट दिली.

गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले. त्यावेळी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमाचा संबंध असावा आणि त्यांनी ३० रोजी रात्रीच आत्म@#हत्या केली असावी. दोघांचे मृतदेह शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now