कृषीजळगाव जिल्हा

cotton news : कापूस उत्पादक शेतकऱ्याची १२ लाख रूपयांची फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । जामनेर तालुक्यातील शेरी येथील शेतकऱ्याचा कापूस परस्पर विक्री करून १२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आधीच कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. पर्यायी घडलेल्या या घटनेमुळे संतापाची लाट पाहायला मिळत आहे. याप्रकरणी बुधवारी ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता गुजरात राज्यातील एका व्यापाऱ्यावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मराज शांताराम पाटील (वय-३८) रा. शेरी ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आला उदरनिर्वाह करतात. २४ जून २०२२ रोजी त्यांनी अशिषभाई रमणीकभाई हिंग रा. गोकुळधाम मेनरोड, राजकोट गुजरात या व्यापाऱ्याला ११ लाख ८३ हजार किंमतीचा कापूस विक्री केला होता. तेव्हापासून अशिषभाई हिंग हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता.

यासंदर्भात शेतकरी धर्मराज पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयात मध्यस्थी करून शेतकरी धर्मराज पाटील याच्या नावावर (जीजे ११ वाय ६०७२) क्रमांका ट्रक नावावर करून देतो असे आश्वासन दिले होते. परंतू अद्यापपर्यंत ट्रक नावावर केला नाही किंवा पैसे न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आदेशाचे पालन न केल्याने अखेर बुधवारी ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता पहूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अशिषभाई रमणीकभाई हिंग या व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्ष्ज्ञक संजय बनसोड करीत आहे

Related Articles

Back to top button