अतिवृष्टी आणि मंदीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा कापूस उत्पादन तब्बल १५ ते २० टक्के घटले आहे. यामुळे सध्या प्रति क्विंटलला सात ते नऊ हजारांचा भाव मिळत आहे. मात्र मंदीच्या प्रभावाने आगामी काळात भाववाढीची शक्यता कमी आहे. अधिक माहिती अशी कि, सध्या सूतगिरण्यांमधून कापसाला मोठी मागणी आहे. युरोपीय देशांसह अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर कापूस निर्यात होत असल्याने मागणी पाहायला मिळत आहे. मात्र येत्या काळात हि कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात चांगला पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. गतवर्षी कापसाला ९ ते १३ हजारांपर्यंत भाव मिळाल्याचे पाहायला मिळत होते. पर्यायी कोरडवाहू कपाशीची लागवड ३ लाख ४ हजार ३३ हेक्टर, तर बागायती लागवड २ लाख ३९ हजार २२९ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली.
सध्या कापूस वेचणीही सुरू आहे. वेचणीवेळीच पाऊस होत असल्यामुळे कापसाचे उत्पादन घटणार आहे. भाव चांगला असल्याने तूट भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र भविष्यात काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही.शेतमालाला चांगला भाव मिळेल असे जरी शेतकऱ्याला वाटत आहे. मात्र आर्थिक मंदीची भीती असल्यानाने भविष्यात काय होईल? कोणीच सांगू शकत नाही.