जळगाव लाईव्ह न्यूज : २१ एप्रिल २०२३ : राज्यात कापसाच्या विक्रमी लागवडीसाठी प्रसिध्द असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. आधीच कापूस उत्पादक शेतकर्यांपुढील संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाहीये. कापूस वेचणीपासून आजपर्यंत कापसाला अपेक्षित भाव मिळालेला नाही.
यामुळे असून अजूनही ७० टक्के कापूस घरातच आहे. पडून-पडून हा कापूस पिवळा पडायला लागला आहे. घरात साठविलेल्या कापसाला आता कीड लागून कापसाचे वजनही कमी होत आहे. अशातच उन्हाचा तडाका वाढल्याने कापूस पूर्णता कोरडा होत आहे. यामुळे शेतकर्यांने करावं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच कृषी विभागाच्या अंदाजामुळे संकटात अजून भर पडली आहे.
जिल्हा कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात पीक पेरणीचे नियोजन केले जात आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा तापमान वाढणार असून, पाऊसही लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामाच्या पेरण्यांबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, मागील वर्षी पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. त्यातील ७० टक्के कापूस आजही शेतकर्यांच्या घरात आहे. कापसाला १० हजारांच्या वर भाव मिळेल, या आशेने शेतकर्यांनी कापूस विकला नाही. अजूनही कापसाला भाव नाही. त्यामुळे यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र कमी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. या उलट मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
कापसाचा दर्जा खालवतोय
अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील कापसाचा भाव हा ७००० ते ८००० रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव मिळत नसल्याने भाववाढ कापसाचा भाव १०००० झाला नाहीये. यामुळे शेतकर्यांनी आपला कापूस घरात ठेवला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ७० टक्के कापूस अद्याप शेतकर्यांच्या घरात आहे. यामुळे कापसाच्या वजनात घट होऊ लागली आहे. याचबरोबर कापसाचा दर्जाही खालवला आहे. यामळे शेतकरी चिंतीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात कापसाची टंचाई निर्माण झाल्याने दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील पन्नास जिनिंग बंद झाल्या आहेत. तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.