वैयक्तिक शौचालयात भ्रष्टाचार प्रकरण, बीडीओ दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई; आतापर्यंत २४गजाआड
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । रावेर पंचायत समितीत वैयक्तिक शौचालयाच्या अनुदात झालेल्या दिड कोटींच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी शहानिशा करूनच आरोपींना अटक करण्यात येत आहे. आतापर्यंत सरकारी अधिकारी व लाभार्थी मिळून एकूण 24 आरोपी अटकेत असून यात गटविकास अधिकार्यांचा (बीडीओ) रोलदेखील तपासला जात आहे. भ्रष्ट्राचारात त्यांचा काही रोल आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
आगामी सण-उत्सवानिमित्त रावेर पोलिस ठाण्यात शांतता कमेटीची बैठक झाली. या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी रावेर पंचायत समिती शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. अनुदान वर्ग करणारे तसेच चेकवर जॉइन स्वाक्षरी करणारे लेखाधिकारी अटकेत असतांना बीडीओंना अभय का ? या प्रश्नावर पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे म्हणाले की, भ्रष्ट्राचार प्रकरणात बीडीओ यांचा रोल तपासला जात आहे. यात त्यांचा काही रोल आढळल्यास त्यांच्यावरदेखील निश्चित कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.