⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

तामसवाडी येथे “कोप बंधारा” दुरुस्ती कामाचे खासदार रक्षा खडसेंच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या “कोप बंधारा” दुरुस्ती कामाचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बंधारा दुरुस्ती’साठी ८३ लक्ष रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला. असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे, उत्तर महाराष्ट्र किसन मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, प.स.सभापती कविता कोळी, जि.प.सदस्य नंदू महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, तालुका अध्यक्ष राजेंद्र लासुरकर, माजी प.स.सभापती जितेंद्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, प.स.सदस्य पी.के.महाजन, प.स.सदस्य जुम्मा तडवी, शुभम पाटील, संदिप सावळे आदी उपस्थित होते.

रसलपुर येथे “प्राथमिक आरोग्य केंद्राच्या” इमारतीचे खासदार रक्षा खडसेंच्या हस्ते भूमिपूजन

रावेर तालुक्यातील रसलपुर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, मुख्य इमारतीचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २.१८ कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे, उत्तर महाराष्ट्र किसन मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, प.स.सभापती कविता कोळी, जि.प.सदस्य नंदू महाजन, कैलास सरोदे, नंदा पाटील, प.स.उपसभापती धनश्री सावळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, तालुका अध्यक्ष राजेंद्र लासुरकर, माजी प.स.सभापती जितेन्द्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, शिवाजीराव पाटील, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, प.स.सदस्य पी.के.महाजन, प.स.सदस्य जुम्मा तडवी संदिप सावळे, रसलपुर सरपंच साजिदा शेख रशीद, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील आदी उपस्थित होते.