⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दिलासादायक : ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या झाली कमी; जाणून घ्या आजची कोरोना आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे कोरोना आकडेवारी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. दरम्यान, आज शुक्रवारी ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या झाली कमी झाली असून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ९ जणांचा बळी गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच आठवडाभरापासून रोजचे मृत्यूही काही प्रमाणात घटले आहेत. शुक्रवारी ५ हजार ०९८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी८६१ नवे बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ८९३ वर गेली आहे. आज दिवसभरात ८११ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २१ हजार ७८२ वर पोचला आहे. तर गेल्या २४ तासात ९ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृताचा एकूण आकडा २३९५ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ९७१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरासाठी दिलासा :

मार्च महिन्याच्या सुरुवातील जळगाव शहरात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होती. मात्र मागील महिन्यापासून जळगाव शहरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज तर शहरात २ ते ३ महिन्यानंतर सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात ६० नवे रुग्ण आढळून आले आहे तर १८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या १२३३ रुग्ण उपचार घेत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर ६०, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ ८२, अमळनेर २९, चोपडा ६८, पाचोरा ४, भडगाव ३, धरणगाव २९, यावल ३२, एरंडोल ४४, जामनेर १६, रावेर ४७, पारोळा ३५, चाळीसगाव ९२, मुक्ताईनगर ७२, बोदवड ३४, अन्य जिल्ह्यातील १८.