जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लावून देखील जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल ११९१ नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८७ हजार ८७९ झाली आहे. त्यात एकूण ७४ हजार ५९४ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा देखील वाढत आहे.
असे आढळले रुग्ण :
जळगाव शहर १७१, जळगाव तालुका ४७; भुसावळ १९३, अमळनेर- १२०; चोपडा- २३३; पाचोरा ४१; भडगाव ४८; धरणगाव ४८; यावल २४; एरंडोल ६५, जामनेर ४६; रावेर २६, पारोळा २०; चाळीसगाव ५६; मुक्ताईनगर ३१; बोदवड-२० आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे ११९१ रूग्ण आढळून आले आहेत.