⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोठा दिलासा : जळगाव जिल्ह्यात तब्बल ४ महिन्यानंतर नवीन रुग्ण संख्या २० च्या आत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ ।  मागील काही दिवसापासून नवीन रुग्ण संख्या ५० च्या आत आढळून येत होती. परंतु आज बुधवारी तब्बल चार महिन्यानंतर नवीन रुग्ण २० च्या आत आढळून आले आहे. आज दिवसभरात १५ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज तब्बल ११ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात येऊ लागला आहे. कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटच्या धोक्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले असले, तरी दैनंदिन रुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांकडे झेपावला आहे. जिल्ह्यात आज १५ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ३०९ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ०७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २५७० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६६४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 

 आजची आकडेवारी

जळगाव शहर-०५, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.