दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या घटतेय ; आज ११०३ कोरोनामुक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून गुरुवारी पुन्हा नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज गुरुवारी दिवसभरात १०६३ नवे रुग्ण आढळून आले तर ११०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत २१ जणांचा बळी गेला.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गेल्या महिन्यात वाढलेली तीव्रता आता तीन आठवड्यांपासून काहीअंशी कमी होत आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आज गुरुवारी तब्बल ११ हजार ६६३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०६३ नवे बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ९९७ वर पोचली. तर ११०३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ८ हजार १२९ झाला आहे. २१ जणांच्या मृत्युने बळींची संख्या २१६३ वर पोचली आहे. अद्यापही मृत्यूदर १.७९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ७०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरात १६७, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९३, अमळनेर २०५, चोपडा ९०, भडगाव ९, पाचोरा ४७, धरणगाव २०, यावल २८, एरंडोल ८६, जामनेर १२६, रावेर ४६, पारोळा १९, चाळीसगाव ७४, मुक्ताईनगर ०२, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ७ असे एकूण १०६३ रुग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज