fbpx

जळगाव जिल्ह्यात आज ०९ बाधित रुग्णांची नोंद ; १३ तालुके निरंक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ ।  आज मंगळवारी जळगाव जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले आहे. तर १२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात येत आहे. तिसऱ्या लाटेबाबत इशारा मिळत असताना सध्याची दुसरी लाट ओसरल्याची चिन्हे आहेत. दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत असून, बरे होणाऱ्यांचा आकडाही जास्त आहे. 

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५७२ इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९१२ वर आहे. जिल्ह्यात सध्या ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.१३ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-००, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -००, अमळनेर -०१, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-०७, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० असे एकुण ९ बाधित रूग्ण आढळले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज