जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । जळगावातील कोरोना आकडेवारी रोजच वाढत आहे. आज जिल्ह्यात नवीन १ हजार ४८ कोरोना रुग्ण आढळून आले असून १ हजार ३० रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे.
जिल्हा कोविड रूग्णालयातर्फे पाठविण्यात आलेल्या अहवालानुसार दिवसभरात १०४८ रूग्ण बाधित आढळून आले. तर १ हजार ३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह जामनेर, रावेर, भुसावळ तालुक्यात संसर्ग कायम आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी नागरीकांनी काळजी घेणे हाच एक पर्याय आहे.
जिल्ह्यात आजच्या बाधित रूग्णांमुळे एकुण १ लाख १४ हजार ७५२ बाधित रूग्णांची संख्या झाली असून त्यापैकी १ लाख १७८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९२७ बाधित रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०३७ वर गेला आहे.
जळगाव शहर- २०४, जळगाव ग्रामीण- २८, भुसावळ-९०, अमळनेर- ८४, चोपडा- ८४, पाचोरा- ५३, भडगाव-२८, धरणगाव- ३४, यावल- ३७, एरंडोल- २०, जामनेर- १०५, रावेर- ९७, पारोळा- ४६, चाळीसगाव- ५०, मुक्ताईनगर- ३१, बोदवड- २६ आणि इतर जिल्हे ३१ असे एकुण १०४८ बाधित रूग्ण आढळले आहे.