जळगावात आज ११४२ नवीन रुग्ण तर १५ जणांचा मृत्यू; शहरात सर्वाधिक २४९ रुग्ण

एप्रिल 2, 2021 7:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज एक हजारांच्या वर कोरोना रुग्ण आढळून येण्याची मालिका आजही कायम आहे. आज जिल्ह्यात तब्बल ११४२ नवे रुग्ण आढळून आले आहे. आज १५ जणांचा मृत्यु झाला असून सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातून २४९ इतके आढळून आले आहेत.

corona-updates

दरम्यान, जिल्ह्यात आज ११४२ आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९१ हजार ३२७ झाली आहे. तर आज १२२२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ९५६ वर गेली आहे. दरम्यान, आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १६५३ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ७ हजार ६३१ रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २४९, जळगाव तालुका ३६, भुसावळ १६९, अमळनेर ७६; चोपडा ११५; पाचोरा ४३; भडगाव ३७; धरणगाव ४३; यावल ६६; एरंडोल ५४, जामनेर १२; रावेर २७, पारोळा ५७; चाळीसगाव ६८, मुक्ताईनगर ५७; बोदवड २९ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे ११४२ रूग्ण आढळून आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories