fbpx

जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी दिलासा ; नवे रुग्ण शंभरच्या आत

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. आज दिवसभरात ७७ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १८७रुग्ण बरे झाले. एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत आहे. गुरुवारी तीन महिन्यांनंतर रोजचे नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. शनिवारीही अवघे ७७ रुग्ण समोर आलेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ४१ हजार ४४६ झाली आहे. दिवसभरात १८७ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३६ हजार ८७१ वर पोचला आहे. एका मृत्यूसह बळींचा आकडा २५६१ झाला आहे.  

mi advt

जळगाव ग्रामीण १२, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ ०५, अमळनेर, ०३, चोपडा-०६, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-०४, एरंडोल-०२, जामनेर-०५, रावेर-०५, पारोळा-०३, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ७७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज