fbpx

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ०८ मे २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । मागील काही दिवस जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक होत. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णही कमी होऊ लागले होते. मात्र, आज पुन्हा बाधित रुग्ण अधिक आहे. आज शनिवारी दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ७२० जण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या १ लाख २९ हजार ०४९ रुग्णांपैकी १ लाख १७ हजार ००९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यात मृत्यू सत्र सुरूच आहे. आज पुन्हा १६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २३२० वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.६६ टक्क्यांवर पोहचले आहे.

 आजची आकडेवारी

जळगाव शहर १३३, जळगाव ग्रामीण ६२, भुसावळ १०१, अमळनेर २२, चोपडा ४०, पाचोरा ४३, भडगाव १८, धरणगाव ३३, यावल ३१, एरंडोल २३, जामनेर १०१, रावेर ४८, पारोळा २४, चाळीसगाव ९१, मुक्ताईनगर ४०, बोदवड ५५, अन्य जिल्ह्यातील १२ असे एकूण ८७७ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज