⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज नव्या ९९९ रुग्णांची नोंद ; १०३७ कोरोनामुक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यातून दिलासादायक बातमी येत आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  आज दिवसभरात जिल्ह्यात ९९९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १०३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

 

जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या १ लाख २६ हजार ४५३ रुग्णांपैकी १ लाख १४ हजार ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यात मृत्यू सत्र सुरूच आहे. आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २२७२ वर गेला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.५२ टक्क्यांवर पोहचले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर १६०, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १३६, अमळनेर १४७, चोपडा १५, पाचोरा ६०, भडगाव २५, धरणगाव १७, यावल २६, एरंडोल ६०, जामनेर ४९, रावेर ५९, पारोळा ३२, चाळीसगाव ८२, मुक्ताईनगर ६१, बोदवड २०, अन्य जिल्ह्यातील १८.