कोरोना

जळगाव जिल्ह्यातील आजचा कोरोना अहवाल ; १ नोव्हेंबर २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाहीय. तर आज जिल्ह्यात १ बाधित रुग्ण बरा झाला. जिल्ह्यात सध्या ९ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७९ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ९ संक्रमित रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आजपर्यंत २५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९८.१८ इतका आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 27 लाख 72 हजार 4 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 20 लाख 73 हजार 924 जणांना पहिला डोस तर 6 लाख 98 हजार 80 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 73 हजार 924 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 6 लाख 98 हजार 80 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 27 लाख 72 हजार 4 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 11 लाख 38 हजार 46 तर ग्रामीण भागातील 16 लाख 33 हजार 958 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार आज सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button