शुभवार्ता : जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा आजही ‘भोपळा’
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात आजही (बुधवारी) नवीन कोरोना रुग्णांची नोंद नाहीय. तर आज जिल्ह्यात एक रुग्ण बारा होऊन घरी गेले आहे. दरम्यान, आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेनंतर जूनपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. सलग तीन ते साडेतीन महिने दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.
मागील गेल्या दोन महिण्यापासून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील काही दिवसापासून नवीन रुग्ण संख्या ५ च्या आत आढळून येत आहे. तर काही दिवसापासून एकही मृत्यूची नोंद नाहीय. जिल्ह्यात आता केवळ ९ रुग्ण उपचार घेत आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३५ रूग्ण बाधित आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.