⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या १५० च्या आत

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे १३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, आज १० तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय.

जळगाव जिल्ह्यात मे महिन्यापासून उतरत चाललेला कोरोना संसर्गाचा आलेख जुलैत झपाट्याने खाली आला. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा दररोज वाढताच आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार ५०० झाली आहे. त्यात बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३९ हजार ७९६ वर पोचला आहे. तर जिल्ह्यात सध्या १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५७५ वर गेला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर -०, चोपडा -०, पाचोरा -०, भडगाव -०, धरणगाव-१, यावल -०, एरंडोल -०, जामनेर -०, रावेर -०, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.