fbpx

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येतोय ; आज केवळ ७ रुग्ण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, महिनाभरापासून दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरू आहे. आज शुक्रवारी दिवसभरात केवळ ७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात एकही रुग्णांची नोंद नव्हती. परंतु आज एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर व भुसावळ, पाचोरा, जामनेर आणि चाळीसगाव तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाहीये.

मे महिन्यात जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहा हजार पेक्षा जास्त होती. मात्र, मे महिन्याच्या अखेरपर्यंत घटून ती साडेपाच हजाराच्या टप्प्यात आली. त्यापाठोपाठ आलेला जून महिना देखील जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. सध्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३०० च्या आत आली आहे. 

जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार ४३१ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५७१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सध्या आता २८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील मृताचा एकूण आकडा २५७४ वर गेला आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव -०, धरणगाव-०,  यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०,  बोदवड-० असे एकुण ०७ बाधित रूग्ण आढळले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज