जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख उतरताचा ; वाचा आजची आकडेवारी
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उतरता आलेख कायम आहे. आज गुरुवारी कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ३२ कोरोनामुक्त झाले आहे. आज १० तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात सध्या ३१३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसापासून एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय हा सर्वात मोठा दिलासा आहे.
जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. मार्च व एप्रिलपर्यंत ‘पीक’वर असलेला संसर्ग आता जुलैत नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. जिल्हाभरात एकुण १ लाख ४२ हजार ४२४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३१३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.