fbpx

जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : ०७ जुलै २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नव्या रुग्णांची संख्या २० च्या आत येत आहे. तर बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा आहे.  दरम्यान, आज बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १५ रुग्ण आढळून आले आहे. तर ५० जण कोरोनामुक्त झाले आहे. आज १२ तालुका निरंक असल्याचे दिसून येत आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सक्रिय रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली. दररोज आढळणाऱ्या नवीन बाधितांची संख्याही कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत गेली.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ४१० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३३१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.  

 

आजची आकडेवारी

जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-४, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव-०,  यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०,  बोदवड-० असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt