जळगाव जिल्ह्यात आज ३ नवीन रुग्ण, १४ तालुके निरंक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ०३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही. तर आज १४ तालुके निरंक आहेत.

जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दहाच्या आत असताना पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वांत कमी म्हणजे अवघी १ ही संख्या काल सोमवारी नोंदली गेली. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील प्रारंभापासून म्हणजे एप्रिल २०२० ते आजपर्यंतच्या १६ महिन्यांत असे पहिल्यांदाच घडून आले. काल नोंदली गेलेली ही संख्या जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे संकेत देत असली तरी बाजारपेठेवरील निर्बंध शिथिल होत असताना आता सर्वांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ६०९ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९७० वर पोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. जिल्ह्यात आज एकही मृत्यू झालेला नसून एकूण मृताचा आकडा २५७५ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -००, अमळनेर -००, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० असे एकुण ०३ बाधित रूग्ण आढळले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -