जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । सावदा शहरातील सर्व खाजगी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक / खाजगी वाहतूक यांचेशी संबंधित कर्मचारी, होम डिलीव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी, विविध परिक्षेचे आयोजनाशी संबंधित कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, खाद्यपदार्थ विक्रेते, औद्योगिक निर्मिती करणारे घटकात काम करणारे कामगार / कर्मचारी / स्टाफ इ. संबंधित कर्मचारी, ई – कॉमर्स मधील कर्मचारी, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, पेट्रोल पंप, सर्व बॅंका, सर्व हॉस्पिटल्स, मेडिकल,सर्व दुकानदार,दुकानामध्ये कार्यरत कर्मचारी,सर्व व्यापारी यांची covid टेस्टिंग करणे म जिल्हाधिकारी यांच्याकडून बंधनकारक करण्यात आलेले असून सावदा शहरात Covid टेस्टिंग सावदा नगरपालिका जवळ पूरक इमारत येथे,तसेच ग्रामीण रुग्णालय येथे सुरू आहे.
आज दिनांक १३ एप्रिल रोजी नगरपालिका फिरते पथकाने शहरातील हॉस्पिटल्स,मॉल्स,दुकानदार , केळी व्यापारी, फळविक्रेते यांच्याकडे भेट देऊन ज्यांनी टेस्टिंग केलेली नाही त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची टेस्टिंग करण्यात आली.
शहरात आज नगरपालिका तर्फे एकूण विक्रमी १५८ नागरिकांची टेस्टिंग करण्यात आली त्यापैकी एकूण २२ positive रूग्ण आलेले असून सावदा शहरातील ७ positive व्यक्तींचा समावेश आहे.
सदरील टेस्टिंग कॅम्प सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके,संगणक तंत्रज्ञ धीरज बनसोडे,राजेंद्र मोरे,संदीप पाटील,महेश इंगळे,योगिता वायकोळे हे आयोजित करत आहे.
सदरचे टेस्टिंग १५ एप्रिल पर्यंत करणे बंधनकारक असून सर्व शासकीय सुट्टी, रविवारी या दिवशी देखील चालू राहणार आहे .अन्यथा प्रती व्यक्ती 1000 रु तसेच सबंधित आस्थापना यांच्यावर 10000 रु दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पालिके तर्फे सांगण्यात आले.