जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । पाचोरा शहरात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता आज एप्रिल 22 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानाकावर पाचोरा शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाश्याचे ‘अँटीजन कोविड टेस्ट’ करण्यात आली. यावेळी १० जणांची चाचणी करण्यात आली तर यात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
पाचोरा नगरपालिकेच्या सीईओ शोभा बाविस्कर, पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, शहरी प्राथमिक आरोग्य अधिकारी बाहेरपुरा डॉ. सुनील गवळी यांच्या उपस्थितीतीत आरोग्य सेविका भारती पाटील, वनिता जाधव व आरोग्य सेवक आकाश ठाकूर यांनी हि कोरोना चाचणी करून घेतली.