⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

ब्रेकिंग…आदेश निघाले, अत्यावश्यक दुकानांची वेळ ४ तास

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ ।  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या दुकानांचा वेळ सकाळी ७ ते ११ ठेवण्याचे निश्चित केले होते. राज्य शासनाने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे  ठाकरे सरकारने अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकानांच्या वेळेत बदल केल्या आहे. 

त्यानुसार किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.

नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.

दरम्यान, आता या निर्णयामुळे व्यापारी वर्गात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.