जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । सध्या कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय घातक सिद्ध झाली आहे. सर्व सामान्य माणसाच्या जीवनात मोठं संकट उभे करत आहेत, या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात युवा महिला पुरुष मरण पावत आहेत. याचं पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावांत ही मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत असून गेल्या महिन्यात सुमारे 24 महिला- पुरुष यांचें अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभारखेडे येथे असे एकामागोमाग एक अशी जणू मृत्यू शुखंलाचं गठीत करण्यात आली आहे कि काय ? असे वाटत असून सर्व कुंभार खेडा गावकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे, संबंधित गांवकरी मृत्यूच्या सावटाखाली जीव मुठीत धरून दिनचर्या पार पाडीत आहेत. यामुळे कोणीही कुणाच्या द्वार दर्शनासाठी जात नाही, तसेच मयताचे भाऊबंद , नातेवाईक, मित्र मंडळी सदर मयताच्या कुटुंबातील सदस्यांना सांत्वनासाठी सुध्दा पुढे येण्यासाठी धजत नाहीत, व
तेही खूप दूरवर चे अंतरावर आहेत यासारखे वागत आहेत. कुटुंबातील कर्ती व्यक्ती अचानक सोडून जात असल्याने मयताच्या कुटुंबातील सदस्यांची अवस्था एकदमच पोरकी मानसिकता तयार होत आहे. यामुळे मयताच्या कुटुंबातील सदस्यांना माणसातील माणुसकी एक प्रकारे संपलेली आहे, यांचें प्रत्ययास येत आहे.
काही दिवसांपूर्वी प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली पण त्याचा लाभही आसपासच्या गावातील लोकांनी परस्पर लसीकरण करून घेतलं. गावात लसीकरण मोहीम विषयी साधी माहिती दिली गेली नाही. याबाबत मार्गदर्शन, जागरुकता निर्माण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. यामुळे गावात पुढच्या दिवसांत अजून कोरोनाचा कहर नक्कीच वाढेल याविषयीची शंकाच नाही म्हणून कुंभारखेडा गावातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.