जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । कोल्हापूर येथील नितीन गणपत नांगेनुरकर ( वय २९) या तरुणाने १ सप्टेंबर २०२० रोजी कोल्हापूर वरुन आपल्या स्वतःच्या सायकल ने प्रवास करीत कोरोना रोखण्यासाठी स्वतः एकटा स्वतः च्या सायकल वर फिरत आहे.
तो आज एरंडोल येथे आला असता त्याने सांगितले आतापर्यंत त्याने गेल्या ७ महिन्यात तब्बल ३० हजार किलोमीटर अंतर सायकलिने प्रवास करीत ३२ जिल्हे व २८० तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी स्वतः च्या सायकलवर एकटा फिरुन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार करीत आहे.त्याने आपल्या अंगात कोरोना काळात घ्यावयाचे काळजी विषयीचे बॅनर घातले असुन त्याने आपल्या डोक्याच्या केसांची कटिंग सुद्धा ‘गो कोरोना’ या वाक्याची केली आहे.
सायकलीवर सुद्धा जो झेंडा लावला आहे त्यावर सुद्धा कोरोना रोखण्याचे ब्रीद वाक्य लिहलेले आहे. डोक्यावर टोपी देखील सूचनांचे वाक्य असलेली घातली आहे.नितीन यांना त्यांच्या गावातील सरकारी गाडीवरील ड्रायव्हर नंदराज नांदावडेकर यांनी ही कल्पना सुचवली. नितीन यांचे कोल्हापुरातील चंदगड येथे सायकलीचे दुकान आहे. त्याचे शिक्षण ७ पर्यंत झाले असुन घरी आई, वडील व बहीण असा परिवार आहे.ते ज्या जिल्ह्यात जातात त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी त्यांना जेवणाची सोय करतात असे त्याने सांगितले.
तसेच गेल्या महिना भरापासून जळगाव जिल्ह्यात ते सायकलीने फिरत असुन त्यांना जळगाव जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष प्रताप कौतिकराव पाटील यांनी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच चोपडा येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे भेटले असता त्यांनी देखील अस्तेवाईकपने चौकशी करुन मदत केली असल्याचे नितीन यांनी सांगितले. आपल्या या प्रवासाचा उद्देश कोरोना जनजागृती असुन यातुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.