⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 28 रोजी जळगाव दौऱ्यावर ; असे आहे कार्यक्रमाचे नियोजन..

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) पाच-सहा महिन्यावर येऊन ठेपले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून अनेक नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत असून दौरे करीत आहे. दरम्यान कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) येत्या शनिवारी (ता. २८) जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

असे आहेत कार्यक्रमाचे नियोजन
शेगाव येथून शुक्रवारी (ता. २७) रात्री ११.३८ ला त्यांचे विदर्भ एक्सप्रेसने जळगाव येथे आगमन व रात्री मुक्काम असेल. शनिवारी सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत गोदावरी इजिंनिअरिंग कॉलेज येथे जळगाव शहर व ग्रामीण कॉंग्रेसच्या आढावा बैठकिस ते उपस्थित राहतील. दुपारी बारा ते एकपर्यंत पत्रकार परिषद होईल.

दुपारी दोनला मोटारीने बोदवडकडे प्रयाण, दुपारी तीन ते पाचपर्यंत बोदवड येथे जाहीर सभा, सायंकाळी पाचला मोटारीने जळगावकडे प्रयाण आणि सायंकाळी सहा ते सातपर्यंत जळगाव शहर महानगराध्यक्ष श्‍याम तायडे यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतील.

त्यानंतर सायंकाळी सातला धरणगावकडे प्रयाण, ७.४५ ते ८.१५पर्यंत धरणगाव येथे कॉंग्रेस कार्यालयाचे उद्‌घाटन व रात्री सव्वाआठला ते अमळनेरकडे प्रयाण करतील. रात्री ८.४५ ते दहापर्यंत अमळनेर येथे नियोजित कार्यकमांना उपस्थिती व रात्री दहाला ते नंदुरबारकडे प्रयाण करतील.