⁠ 
सोमवार, मे 6, 2024

खडसेंनंतर जिल्ह्यातील एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा!

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । राज्यात भाजपचे (BJP) नेत्यांकडून ठिकठिकाणी भाषणांमधून काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले जात आहे. मागच्या दोन तीन दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा राज्या सुरू झाली. मात्र अशातच खडसेंबाबतची चर्चा थांबत नाही तोच जळगावातील काँग्रेसचा एक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरुन जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhari) हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरूय. मात्र भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर आमदार शिरीष चौधरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अनेक कार्यकर्ते, भाजपतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. मात्र मी भाजपमध्ये जाणार अशी कुठलीही परिस्थिती सध्या नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा ठेवून आम्ही काम करतो आहे, असं स्पष्टीकरण आमदार शिरीष चौधरी यांनी दिलं आहे.

ही एक अफवा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच हितचिंतकांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, यामुळे ही अफवा पसरवली जात आहे. मात्र पक्ष विषयी प्रतारणा करण्याचं कुठलही कारण नाही. कारण असतं तर दुसरी गोष्ट असती. अशी काही भूमिका घेतली तर मी त्याबाबत स्पष्ट सांगेल. कारण यापूर्वी नेहमी माझी भूमिका ही स्पष्टपणे सांगितली आहे. त्यामुळे आताही तसं काही असेल तर सर्वांसमोर जाहीर करेन. अशा चर्चांनी मी अस्थिर होणारा पदाधिकारी नाहीये, असं म्हणत अफवा पसरवणाऱ्यांना आमदार शिरीष चौधरी यांनी सुनावलं आहे.