⁠ 
शनिवार, मे 4, 2024

महागाईविरोधात यावल येथे काँग्रेसचे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । गोपाळ भारुडे । पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरचे दर प्रचंड वाढले आहे. यामुळे महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडली गेलीय. दरम्यान, या महागाईविरोधात आज यावल काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले असून, राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या आवारात काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी महागाईच्या विषयावर वढोदे येथील श्री दुर्गामाता महीला भजनी मंडळीने जनजागृतीपर लोकगीत सादर करून जनतेचे लक्ष वेधले. तर स्कुटर लोडगाडीवर ठेवत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाआंदोलनानंतर आज दुपारी ४ वाजता मोदी शासनाच्या निषेर्धात मोर्चा काढण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी, माजी नगरसेवक समीर शेख मोमीन, माजी नगरसेवक गुलाम रसुल, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, राहुल तायडे, विलास अडकमोल, अजय अडकमोल, संदीप सोनवणे, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी, पुंडलीक बारी, संगोयोचे माजी अध्यक्ष खलील शाह यांच्यासह आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.