जळगाव जिल्हा

खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । केंद्र शासनाच्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ चे आयोजन हरियाणा येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे खो-खो व कबड्डी या खेळाच्या मुले व मुली तसेच बास्केटबॉलच्या मुलींचा संघ पात्र ठरला आहेत. त्यानुसार राज्याचा संघ निवड करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर खो-खो व कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धां व निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर खो-खो या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन २२ व २३ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडुनी २२ रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे. तसेच जिल्हास्तरावर कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन २३ व २४ रोजी ॲड. एस.ए. बाहेती महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडुनी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी९ वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कबड्डी खेळासाठी मुलांकरीता वजनगट ७० किलो किंवा त्यापेक्षा कमी व मुलींसाठी वजनगट ६५ किलो किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच बास्केटबॉल या खेळाचे मुलींच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन जिल्हास्तरावरुन थेट राज्यस्तरावर करण्यात येणार असून जिल्हास्तरावर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीतील सहभागी खेळाडुमधुन जिल्ह्याचा संघ राज्यस्तरावर सहभागी होण्याकरिता निवडला जाणार आहे. या स्पर्धा संघटनेच्या नियमानुसार होतील व स्पर्धेत सहभागी खेळाडुंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तर खो खो, कबड्डी व बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त संघ व खेळाडुना सुचित करावे, या स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडुची जन्मतारीख १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी खेळाडुंचे संपुर्ण नाव, जन्मदिनांक, आधारकार्ड, शालांत प्रमाणपत्र, १० वी बोर्ड सर्टिफिकेट, जन्मप्रमाणपत्र यापैकी दोन कागदपत्रे, पत्रव्यवहाराचा पत्ता व संपर्क क्रमांकासह लेटर हेडवर सही व शिक्क्यासह प्रवेशिका २० नोव्हेंबरपर्यंत संपुर्ण कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button