---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव आणि रावेर लोकसभेच्या निकालासाठी यंत्रणा सज्ज, कशी असणार प्रक्रिया?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी दि.४ जून रोजी होणार आहे.मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ४ जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल. तसेच ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

loksabha election jpg webp

गुरुवार दि.३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगितली. ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल.

---Advertisement---

मतमोजणी स्थळी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.मतमोजणी स्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही.मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीना मोबाईल आणता येणार नाही याची नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीं समोर सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्त्याना शांतता राखण्याचे आवाहन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होण्याआधी टपाली मतमोजणी होणार आहे.किमान एक फेरी २० मिनिटांची असणार आहे. उमेदवारांना निवडणूकीचा अंतिम खर्च निकालानंतर ३० दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.या साठी २७ जून रोजी अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.तर ३० जून रोजी खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---