⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । एकरुखी, ता.अमळनेर येथे दिनांक 8 मार्च ते 14 मार्च 2022 या कालावधीत पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न झाला. समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एकरुखी गावाचे उपसरपंच श्री सुरेश विक्रम पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक श्री अभिजित भाऊ भांडारकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक सुप्रीम पाटील, निकिता वरोळे, अश्विनी जाधव आणि लिलाधर कोळी यांनी निवासी शिबिराच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा लेखाजोगा सादर केला, स्वयंसेवकांनी गावात केलेले स्वच्छतेचे काम, जनजागृतीचे कार्य, पर्यावरणाविषयी आणि सामाजिक समस्यांची जाणीव करून देण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून केलेले प्रयोग सादर केले. लोकसहभाग मिळविण्यासाठी PRA या तंत्राचा गाव विकासाकरिता कसा उपयोग होतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

शिबिर समन्वयक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अस्मिता धनवंत सरवैया यांनी गेल्या सात दिवसात दैनंदिन कार्याची माहिती देत असताना सांगितले की श्रम संस्कार व्यतिरिक्त बौद्धिक क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी एस पाटील, प्रा विजयकुमार वाघमारे,प्रा डॉ जगदीश सोनवणे, डॉ. गणेश पाटील, ग्रामीण रुग्णालय अमळनेर, प्रा. डॉ. एस आर चव्हाण, प्रा डॉ अनिता खेडकर प्रा डॉ श्वेता वैद्य, प्रा डॉ भरत खंडागळे, प्रा डी आर ढगे, प्रा डॉ मारुती गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा डॉ मनिष करंजे, प्रा डॉ राहुल निकम, प्रा डॉ राहुल इंगळे, प्रा डॉ डी आर चौधरी, पाणी फाउंडेशन चे कार्यकर्ते श्री सुखदेव भोसले, माजी विद्यार्थी गोविंदा साळुंखे अशा अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि अमळनेर रोटरी क्लब च्या माध्यमातून आदिवासी एकलव्य भिल्ल वस्तीत कपडे दानाचे कार्यक्रम उल्लेखनीय ठरला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सुरेश विक्रम पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करून गाव पातळीवर स्वयंसेवकांनी केलेले कार्य अतिशय प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे असे सांगितले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे संचालक श्री अभिजित भाऊ भांडारकर यांनी सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हणाले की मुळात समाजकार्याचा वसा घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवासी शिबिराच्या माध्यमातून ग्राम विकास ही संकल्पना चांगल्या पद्धतीने राबवता आली तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करत असताना विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पथनाट्याच्या माध्यमातून केलेली जनजागृती अतिशय उल्लेखनीय आहे.

शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्व-विकास करून घेणे अभिप्रेत होते ते याठिकाणी त्यांनी मिळविले आहे असे दिसून येते भविष्यात अशाच प्रामाणिक आणि मेहनतीचे कार्य करण्याचे आव्हान केले. सूत्रसंचालन सनी पाटील वआभार प्रदर्शन मयुरी पाठक या स्वयंसेवकांनी केलें. शिबिराच्या यशस्वितेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा डॉ सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मनीष करंजे, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संजय शिंगाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील, कार्यालयीन अधिक्षक अनिल वाणी, लिपिक योगेश संदांशिव, सेवक महेश शेलार, कोमल सूर्यवंशी, ईश्वर ठाकरे, देवेंद्र सरदार, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, एकरुखी गावातील शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचे सहकार्य मिळाले.

हे देखील वाचा:

author avatar
टीम जळगाव लाईव्ह