जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबत नसून दररोज दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत मंगळवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोलाणी मार्केटमधील शोभाराम इन्फोटेक येथे अभियंता म्हणून राकेश योगराज पाटील रा.खेडी बुद्रुक हे काम पाहतात. दि.२२ रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास त्यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीई.३१८४ ही संतोष ज्यूस सेंटरसमोर लावली होती. ८ वाजता ते परत आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास प्रफुल्ल धांडे करीत आहे.
जळगाव पीपल्स बँकेच्या दाणाबाजार मुख्य शाखेत वॉचमन म्हणून ज्ञानदेव हरी कुंभार हे काम करतात. दि.२२ रोजी त्यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.एजे.०९९१ ही बँकेच्या गेट समोर लावली होती. दुपारी ३ ते ५.३० दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केले याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भास्कर ठाकरे हे करीत आहे.
शहरातील दुचाकी चोऱ्यांचे सत्र थांबत नसून अनेक गॅंग उघडकीस येत असल्या तरीही दुचाकी चोरी सुरूच आहे. गेल्या दोन-तीन दिवसातील काही घटना पाहिल्या असता चारचाकी चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.