पुर्नरचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार रु ३५००० /- प्रति हेक्टर नुकसान भरपाई
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2022-23 अंतर्गत जळगाव जिल्हयातील केळी या फळपिकासाठी जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रक्कमेस पात्र ठरणार आहे. यामध्ये 1 ते 30 एप्रिल या कालावधीत सलग 5 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 83 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु 35000/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल.
दिनांक 1 ते 31 मे, या कालावधीत सलग 5 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 61 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु. 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. माहे एप्रिल व मे या दोन्ही महीन्यात जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसुल मंडळांना जास्तीत जास्त 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल
मा. पालकमंत्री जळगाव यांनी भारतीय कृषि विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे. तालुकानिहाय महसुल मंडळानिहाय जादा तापमानाची माहिती – सन 2021-22
– जळगाव जिल्हा – म्हसावद , भोकर, पिंप्राळा, असोदा भुसावळ – कुऱ्हे प्र.न, वरणगाव, पिंपळगाव खु, बोदवड– नाडगाव, यावल – भालोद, बामणोद, फैजपूर, साकळी किनगाव बु, रावेर –खानापूर, खिरोदा प्र.या, निभोरा बु, खिर्डी, ऐनपूर, मुक्ताईनगर– अंतुर्ली घोडसगाव, अमळनेर – शिरुड, नंगाव, पातोंडा अमळगाव, मारवड, भरवस, वावडे, चोपडा– हातेड बु, लासुर, अडावद, धानोरा प्र.अ, गोरगावले बु, चहार्डी , एरंडोल – रिंगणगाव, कासोदा, उत्राण गृ.ह, धरणगाव – साळवा, सोनवद, पिंप्री बु, पाळधी, चांदसर, पारोळा– शेळावे, तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव-, मेहुणबार जामनेर– नेरी, पहुर, पाचोरा – गाळण, नांद्रा, कुऱ्हाड बु, भडगाव- कोळगाव इ.